लाडकी बहीण योजना या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा लाभार्थी यादी पहा

aditi tatkare update

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे  महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात.

👉या यादीत आपले नाव पहा👈

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

👉या यादीत आपले नाव पहा👈

किती पैसे जमा होणार?

आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

👉या यादीत आपले नाव पहा👈

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

योजनेच्या इतक्या महिला ठरल्या लाभार्थी?

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Comment