Dhananjay Munde 2024

धनंजय मुंडे यांनी ३० ऑगस्ट रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली होती.

२०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी हेक्टरी ५,००० रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.

यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण ४,१९४ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे, ज्यामध्ये कापूस उत्पादकांसाठी १,५४८ कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादकांसाठी २,६४६ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.

तर ज्या शेतकऱ्यांनी २०२३ या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस पिकाचे उत्पादन घेतले होते अश्या शेतकऱ्यांना १० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान हेक्टरी ५,००० रुपये अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे