मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्जासाठी नवीन वेबपोर्टल सुरु लगेच अर्ज करा Saur Krushi Pump Yojana

Saur Krushi Pump Yojana

 

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.

 

👉अधिकृत वेबपोर्टल पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

 

सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना  जाहीर केली आहे.

 

👉अधिकृत वेबपोर्टल पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

 

सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भारवी लागेल.

Leave a Comment